स्मार्ट सफाईसाठी
केवळ गृहसजावट आकर्षक असून चालत नाही , तर घराची नीट स्वच्छताही राखणे महत्वाचे असते . हल्ली नोकरदार महिलांचा दिनक्रम व्यग्र असल्याने कमीत कमी वेळ आणि श्रमात अधिक स्वच्छतेसाठी टिप्स :
- स्वयंपाक घराचा सर्वाधिक वापर होत असल्याने तेथील स्वच्छता महत्वाची ठरते . व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्या पाण्याने ओटा पुसावा . तसेच आठवड्यातून एकदा स्वयंपाक घरातील फर्निचर , ड्रोवर , ट्रोली , शेल्फ पुसावेत . आणि
- ओटा , शेगडी, यांवर पदार्थांचे डाग पडल्यास असल्यास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्याने पुसावे
- हॉलमध्ये चपला, शूज, घालून येणे टाळावे . त्यामुळे गालिचावर प्रमाणात धूळ साठते . आठवड्यातून एकदा गालीचा उचलून त्याखालील फरशी झाडून, पुसून घ्यावी, तसेच गालिचे गाद्यांना शक्य तेंव्हा ऊन द्यावे .
- पाण्यात डिटर्जेंट मिसळून महिन्यातून एकदा बेडरूम मधील वार्डरोब व ड्रेसिंग टेबल, काचेचे कॉर्नर पुसावेत . काचांवर साबणाने पाणी फवारून पुसल्यास अधिक स्वच्छ होतात .
- वर्षातून एकदा फर्निचरला पॉलिश करावे . पॉलिश करण्यापूर्वी फर्निचर व्हिनेगरने पुसून घ्यावे. लाकड़ी फर्नीचरच्या स्वच्छतेसाठी एसिड असलेल्या गोष्टींचा वापर टाळावा
- स्वच्छतेची सर्व कामे एकाच दिवशी काढू नयेत, रोज दिवसातील एक ते दीड तास दिल्यास ताण कमी होईल .
घर - - योग्य सल्ला आणि संधी फक्त - इंडिया प्रॉपर्टी कार्ट इथे - पुणे , मुंबई प्रॉपर्टी संदर्भात
www.IndiaPropertyCart.com
केवळ गृहसजावट आकर्षक असून चालत नाही , तर घराची नीट स्वच्छताही राखणे महत्वाचे असते . हल्ली नोकरदार महिलांचा दिनक्रम व्यग्र असल्याने कमीत कमी वेळ आणि श्रमात अधिक स्वच्छतेसाठी टिप्स :
- स्वयंपाक घराचा सर्वाधिक वापर होत असल्याने तेथील स्वच्छता महत्वाची ठरते . व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्या पाण्याने ओटा पुसावा . तसेच आठवड्यातून एकदा स्वयंपाक घरातील फर्निचर , ड्रोवर , ट्रोली , शेल्फ पुसावेत . आणि
- ओटा , शेगडी, यांवर पदार्थांचे डाग पडल्यास असल्यास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्याने पुसावे
- हॉलमध्ये चपला, शूज, घालून येणे टाळावे . त्यामुळे गालिचावर प्रमाणात धूळ साठते . आठवड्यातून एकदा गालीचा उचलून त्याखालील फरशी झाडून, पुसून घ्यावी, तसेच गालिचे गाद्यांना शक्य तेंव्हा ऊन द्यावे .
- पाण्यात डिटर्जेंट मिसळून महिन्यातून एकदा बेडरूम मधील वार्डरोब व ड्रेसिंग टेबल, काचेचे कॉर्नर पुसावेत . काचांवर साबणाने पाणी फवारून पुसल्यास अधिक स्वच्छ होतात .
- वर्षातून एकदा फर्निचरला पॉलिश करावे . पॉलिश करण्यापूर्वी फर्निचर व्हिनेगरने पुसून घ्यावे. लाकड़ी फर्नीचरच्या स्वच्छतेसाठी एसिड असलेल्या गोष्टींचा वापर टाळावा
- स्वच्छतेची सर्व कामे एकाच दिवशी काढू नयेत, रोज दिवसातील एक ते दीड तास दिल्यास ताण कमी होईल .
वास्तु टिप्स
- आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते.
- उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते.
- आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल.
- बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात.
- आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
- घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये .
- भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये .
- झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते.
- घरातील वय वर्ष २५ ते ६० असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे.
- घरामध्ये अडगळ ,भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे.
- घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात.
- नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहुन घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते.
- नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.
- नवीन घर घेताना दक्षिण ,पश्चिम ,नैऋत्य आणि आग्नेय या दिशातुन येणारे दरवाजे टाळावेत.
- भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबु ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा.
- घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.
- घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले ,पाने ,सुकलेली तोरणे काढून टाकावीत . म्हणजे घरामध्ये शुभ उर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत.
- घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पुर्व भिंतींवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पुर्व व उत्तर या शुभ दिशांना होते.
- घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावीत म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते.
- कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते .
- झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणुस कर्ज बाजारी होतो .
- घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेऊ नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते .
- सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .
- बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असु नये .
- लाल , काळा , मरून , हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरा मध्ये सुख - समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात .
- झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये . त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो .
- घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणुन मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे .
- दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्न हर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे .
- घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे .
- आठवडयातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते.
- मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे .
- मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे .
- लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशे मध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात .
- घरामध्ये पैसा, संपत्ती , ऐश्वर्य टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे .
- घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे .
- ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात .
- नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा .
- मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे .
- उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा- बायकोंनी दोन जोडलेल्या बेड वर झोपू नये .
- नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे .
- आरोग्यदायी जीवनासाठी घरा मध्ये पिवळा , काळा , लाल हे रंग कोठेही येऊ देवू नये .
- घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोअरिंग , विहीर पाण्याची टाकी बांधु नये .
- दक्षिणेला पाय करून झोपु नये कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण यांची हानी होते .
- घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते .
- घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक ,शारीरिक व मानसिक हानी होते .
- हिंस्र पशु पक्षांची, जंगली जनावरांची तोंडे , घरामध्ये लावु नयेत .
- घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवु नयेत .
- उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत .
- उत्तम प्रगती साठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी .
- कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे.
- घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतींवर लावु नयेत .
- घरामध्ये कोठेही लाल ,मरून ,काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत .
- घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबु, , मिरची ,राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत .
- घरामध्ये अश्रु ढाळणारया स्त्रियांची ,पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावु नयेत.
- घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले , वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवु नयेत .
- घराचा मुख्य दरवाजा पुर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणताही अडथळा ठेऊ नये .
- घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी सकाळ-संध्याकाळ धुप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्वाचे आहे .
- घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे , भांडणे टाळावीत .
- मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य, उत्तर किंवा वायव्येला असावी.
- मुलांचे स्टडी टेबल पुर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत .
- मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा .
- मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असु नये .
- आपल्या घराचे पार्कींग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्कींगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी .
- नवीन कार घेताना लाल ,काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे .
- नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटसच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये .
- नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज तीन ,सहा ,नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी .
- कार प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्ये भरून ठेवावे .
- घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिंग येऊ देऊ नये .
- घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये .
- घराची उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रोब्लेम येऊ शकतात .
- घरामध्ये देवांचे फोटो भिंतींवर टांगुन ठेऊ नये त्यांचे पावित्र्य भंग होते .
- घरातल्या कर्त्या व्यक्तिने वायव्य दिशेला झोपु नये .
- घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करु नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढु शकतात.
- इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असावा .
- ऑफिस मधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत .
- ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर , पूर्व किंवा ईशान्येचा असावा .
- व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने उत्तर दिशेला तोंड करून बसावे .
- ऑफिस मधील खिडक्या उत्तर आणि पुर्वे दिशेला असतील तर भरपुर प्रगती होते .
- व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपुर होतो .
- ऑफिसमध्ये अकाउंट डिपार्टमेंट उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे .
- ऑफिसमध्ये लाल ,काळा ,मरून हा रंग वापरु नये .
- ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी .
- ऑफिसच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये खड्डा ,चढ-उतार ,उंच वाढणारी झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत .
- ऑफिसमध्ये खुप मोठे देवघर ठेवु नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा .
- ऑफिसमध्ये इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी आग्नेय दिशेला असावेत.
- ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे.
- देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे .
- घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
- गणपती बाप्पाची मुर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
- देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मुर्ती कधीही ठेवु नये प्रत्येक देवाची एक मुर्ती ठेवावी .
- देवघरामध्ये उदबत्ती ,निरंजन आणि समई देवघराच्या आग्नेयेला ठेवावी .
- सुख - समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी .
- दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत.
- घरामध्ये जाळ्या-जळमटे कोळ्यांची घरटी लागु देऊ नये जाळ्या जळमटे मध्ये राहु केतु या पाप ग्रहांचे अस्तित्व असते .
- झुरळे ,मुंग्या ,ढेकुण ,पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे .
- खराब झालेल्या वस्तु शिळे अन्न ,भुरा लागलेले खाद्य पदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते .
- शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक आणि घराच्या आतुन बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी.
- घराचा उंबरा काळ्या कडाप्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा
- घराचा उंबरा पांढरे मार्बल ,प्लायवुड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा
- घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी हिरव्या, निळ्या, पिवळ्या, क्रिम कलरची असावी.
- घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी लाल ,काळ्या ,मरून रंगाची नसावी.
- सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असु नये क्रिम, ऐवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत.
- घराची डोअर बेल ही पालीचा चूक-चूक आवाज करणारी बसु नये हे अशुभ आहे.
- घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते.
- घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपुर्ण वाजल्यामुळे या मंत्र सामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही.
- सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑईलिंग करून घ्यावे दरवाजातून कर-कर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे.
- घरामध्ये स्वयंपाक घर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकनार याची काळजी घ्यावी पाणी टपकने अशुभ मानले जाते.
- घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल ,शुज कधी पालथ्या पडु देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो.
- घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असु नये कारण मुख्य दरवाजातून चांगली उर्जा बाहेर परावर्तित होते.
- विंड चाइमचा (पवन घंटी) मधुर आवाज मनाला शांती देतो दु:ख दुर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.
- विंड चाइम (पवन घंटी) ही सहा पाईपची घराच्या वायव्य दिशेला लावावी.
- नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी, घरातील अडगळ भंगार काढून टाकावीत.
- फिश पॉट घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवावा.
- मुलांच्या स्टडी टेबल च्या समोर लक्ष विचलित करणार पोस्टर किंवा चित्र लावु नये त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाईम टेबल लावावे.
- घरामध्ये सुकलेली फुले ,पाने ,झाडे ठेवु नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- हसरा हॅप्पी मॅन घरात असेल तर हे सकारात्मक दृष्टिकोन उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतिक मानले जाते हे प्रतिक घरात ठेवल्यामुळे दु:ख दुर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते.
- हसरा हॅप्पी मॅन घराच्या मुख्य दरवाजा समोर तोंड करून ठेवावे.
- देवावर वाहिलेली फुले , हार म्हणजेच निर्माल्य घरामध्ये ठेवणे चांगले नसते लगेचच त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे.
- देवी - देवतांच्या मुर्ती किंवा फोटो भितींवर शो -पीस प्रमाणे लावु नये त्यांचे पावित्र्य भंग होते.
- मुख्य प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपू नये त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा अपमान होतो.
- घरातील महत्वाची पुस्तके, कागदपत्रे पुर्व दिशेला असलेल्या कपाटात ठेवावीत.
- नवीन घर घेताना बिल्डिंग आणि स्किमच्या प्लॉट चा एंटरन्स उत्तर आणि पुर्वेचा असावा.
- घरामध्ये पैसे टिकुन रहावे सुख - समृद्धी लाभावी यासाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गजलक्ष्मी घरामध्ये उत्तरेला तोंड करून स्थापन करावी.
- वास्तु पुरुष हा वास्तुशांती केल्यावर घराच्या आग्नेय दिशेला स्थापन करावा.
- वास्तुशांती झाल्यानंतर वास्तु पुरुष सोन्याचा स्थापन करावा.
- घरामध्ये झाडु दरवाजाच्या मागे ठेवावा समोर दिसेल असा ठेवु नये.
- घराच्या मुख्य दरवाजा समोर ओळीने तीन किंवा दोन दरवाजे नसावेत.
- ब्रम्हस्थळाच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो.
- घरामध्ये तुटलेली, फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत.
- घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही.
- कार किंवा टु - व्हिलर पार्क करताना उत्तर आणि पुर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.
- कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत.
- कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, ऐवरी, क्रिम या रंगाचे असावेत.
- घराच्या खिडक्या पुर्व आणि उत्तर दिशेला असाव्यात म्हणजे सुर्य प्रकाश जास्तीत जास्त घरामध्ये येतो.
- दिवाळीचे सहा दिवस लक्ष्मी आगमनाचे , लक्ष्मी पुजनाचे आणि लक्ष्मीला फिरता देणारे असतात त्यामुळे घरामध्ये आनंददायी वातावरण ठेवावे भांडणे वादविवाद, नकारात्मक बोलणे टाळावे.
- दिवाळीचे सहा दिवस शुभ-पुण्य काल लक्ष्मीदायक असतो. लक्ष्मीचा वरद हस्त कायमस्वरूपी घरावरती रहावा यासाठी या कालावधीमध्ये अशुभ कृत्य, अशुभ वर्तन टाळावे.
- दिवाळीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सुंदर रांगोळी काढावी.
- लक्ष्मी पुजनासाठी श्री यंत्र, लक्ष्मीचा फोटो, टाक, नाणी, सोने, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मुर्ती असे ठेवावे.
- घराला रंग रंगोटी करताना घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंग संगती करू शकता.
- महिन्यातुन एक ते दोन वेळा घरामध्ये गोमुत्र सिंचन करावे.
- घरातील देवघर बाथरूम किंवा टॉयलेटच्या बाजुला ठेवु नये.
- हॉल, किचनमध्ये बांबु - ट्री लावल्याने तेथील नकारात्मक उर्जा कमी होते.
- घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवावा त्यामुळे घरामध्ये सुख - समृद्धी येते.
- बेडरूमच्या बाहेरील भिंतींवर चिरा पडु देऊ नयेत यामुळे घरामधील अडचणी वाढु शकतात.
- घरातील समोरच्या भागात, बालकनीमध्ये काटेरी किंवा टोकदार पानाचे रोप लावु नये हे रोप नकारात्मक उर्जा प्रदान करते.
- घरामध्ये तुटलेल्या मुर्तीचे विसर्जन करावे, विसर्जनाच्या आगोदर विधिवत पुजा करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे.
- वास्तुनुसार प्रवेशद्वार सदैव घराच्या आत उघडणारे हवे मुख्यद्वार दोन भागांमध्ये विभागणारे नसावेत.
- आपल्या आवडीची सुगंधित फुले नेहमी आपल्या बेडरूममध्ये वायव्येला ठेवावीत.
- मेडिकल शॉप हे दक्षिण मुखी असु नये.
- औषध - गोळ्या नेहमी ईशान्य दिशेला ठेवाव्यात.
- औषध घेताना तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करायला पाहिजे.
- घरामध्ये पाणी पिताना आपले तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करावे.
- घरामध्ये जेवताना आपले तोंड उत्तर अथवा पुर्व दिशेला करावे.
- देव - देवतांच्या मुर्ती शोकेसमध्ये ठेवु नयेत.
- घराचे प्रवेशद्वार नेहमी आकर्षक ठेवा. दारामध्ये नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.
- घरामध्ये जास्त दिवस तुटलेल्या वस्तु, कचरा साठवुन ठेवु नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- घरामध्ये तुटलेली फ्रेम, आरसे असतील तर ते घरामधुन काढुन टाकावेत यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- नवीन फर्निचर करताना फर्निचरला काळा, मरून, रेड, डार्क ब्लु हे रंग वापरू नयेत.
- घरामध्ये नवीन फर्निचर करताना बेड समोर कपाटांचे, फर्निचरचे टोकेरी कॉर्नर येऊ देवु नये.
- घरामध्ये नवीन फर्निचर करताना कपाट, तिजोरी उत्तरेला अथवा पुर्वेला तोंड करून ठेवावी.
- लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे.
- सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालिसा वाचणे आवश्यक आहे.
- घरामध्ये सुख - समृद्धी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना, वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे.
- वैवाहिक जीवनात सुख - शांती राहण्यासाठी दोन जोडलेल्या बेड वर नवरा बायकोनी झोपु नये.
- घरामध्ये गंजलेले, तुटलेले दरवाजे नसावेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा घरावर वाईट परिणाम होतो.
- घरामध्ये पाण्याचा सप्लाय उत्तर-पुर्व दिशेकडुन करावा.
- घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तु खराब किंवा तुटलेली असेल तर अशी वस्तु घरामधून काढुन टाकावी त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- घरातील पंखे, कुलर यांचा आवाज येत असेल तर दुरूस्त करून घ्यावेत यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- घरामध्ये झाडू उभा किंवा पाय लागेल असा ठेवु नये.
- देवघरामध्ये खिडकी व दरवाजे उत्तर-पुर्व दिशेमध्ये असाव्यात.
- वास्तु मध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकुन रहावी यासाठी दरवर्षी पुजा - पाठ, वास्तुशांत, होम हवन यासारखे धार्मिक विधी नेहमी करणे गरजेचे आहे.
- नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृह प्रवेश न करता विधिवत योग्य शुभ - मुहुर्ताला वास्तुशांत करून रहायला जावे म्हणजे वास्तु लवकरात लवकर लाभते.
- ग्रह बल वाढविण्यासाठी योग्य वास्तु तज्ञाकडुन आपल्या घराची व्हिजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवुन ग्रह दोष निवारण करून घेणे.
- यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवन शैली, सदवर्तन, नम्रपणा, दानशुरता, संयमी वृत्ती या पाच गोष्टींचा भरपुर उपयोग होतो.
- मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कपड्यांचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावुन ठेवु नये.
- घराच्या मुख्य दरवाजासमोर घरातील कोणत्याही व्यक्तिचा किंवा फॅमिली चा ग्रुप फोटो लावु नये.
- घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावावा म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतींवर पुर्वेला तोंड करून लावावा.
- घरातील कुटुंबांच्या सुख - समृद्धी साठी फॅमिली चा एकत्रित फोटो दक्षिण, पश्चिम भिंतींवर लावावा.
- घरामध्ये सुख - समृद्धी साठी घरातील खोल्यांना वेगवेगळा रंग देवु नये.
- बेडच्या समोर आरसा किंवा प्रतिबिंब पडेल अशी कोणतीही वस्तु ठेवु नये.
- बेडरूम मध्ये वाहता धबधबा किंवा पाण्याचे चित्र लावु नये.
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये कोठेही बुडत्या जहाजांचे, हेलकावे खाणाऱ्या बोटीचे चित्र लावु नये.
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये आदिवासी रडक्या, अश्रु वाहणाऱ्या, नैराश्य दाखवणाऱ्या अशा कोणत्याही स्त्री-पुरुषांची चित्र लावु नयेत.
- कोणत्याही बेडरूम मध्ये बेडच्या वरती लटकते झुंबर किंवा लॅम्प येऊ देवु नये.
- घरात बेडरूम मध्ये दक्षिण भिंतीला आरसा येऊ देवु नये.
- मास्टर बेडरूम मध्ये एकट्या स्त्री, दु:खी, रडलेल्या स्त्रीचे चित्र लावु नये हसती-खेळती चित्र लावावीत.
- घरामध्ये डार्क पिवळा रंग देऊ नये, हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो.
- घरामध्ये भिंतीला लाल भडक रंग देऊ नये यामुळे घरात चिड - चिड वादविवाद भांडणे आणि उष्णते संबंधी विकार होऊ शकतात.
- घरामध्ये डार्क गुलाबी, बेबी पिंक असे कलर देऊ नये यामुळे ढेकुण, कृमी किटक, जाळ्या जळमटे, कोळ्याची घरटी असे लागतात.
- घरात सिलिंगला फक्त व्हाईट कलर दयावा, कोणतेही डार्क रंग देवु नये त्यामुळे आकाश तत्त्व बिघडते.
- घराच्या नॉर्थ आणि ईस्ट भिंतीला डार्क रंग किंवा अवजड फर्निचर ठेऊ नये.
- सेफ्टी डोअर किंवा मुख्य महाद्वार यांना काळा, लाल किंवा मरून कलर देवु नये. ऐवरी किंवा चॉकलेटी कलर दयावा.
- नॉर्थ - ईस्ट या भिंतीवरती अवजड पेंटिंग, झुंबर, फोटो, कपाटे किंवा धान्याच्या कोठया ठेवु नयेत.
- मन:शांती आणि घरातील प्रगतीसाठी प्रत्येक रूमची ईशान्य दिशा मोकळी ठेवावी.
- घरामध्ये ईस्त्री, शिवणकाम, भाजी कापणे, मुलांचा अभ्यास घेणे किंवा कॉमप्युटर वर काम करणे ही शुभ कामे पुर्व दिशेला तोंड करून करावीत.
- घरातुन व्यवसाय करत असाल तर उत्तरेला तोंड करून टेबल अथवा कॉमप्युटर ठेवावा.
- रिसेलचे घर घेतल्यानंतर देखील आपल्याला घरामध्ये वास्तुशांत करणे गरजेचे आहे.
- घराच्या उत्तर, ईशान्य, वायव्य दिशेला शेगडी, ओव्हन अशी अग्नी तत्त्वाची कोणतीही गोष्ट येऊ देवु नये यामुळे धन हानी, आर्थिक हानी होते.
- घोडयाची नाल घराच्या मुख्य दरवाजावर उलटी टांगावी ,पायात किंवा उंबऱ्यावर लावु नये.
घर - - योग्य सल्ला आणि संधी फक्त - इंडिया प्रॉपर्टी कार्ट इथे - पुणे , मुंबई प्रॉपर्टी संदर्भात
www.IndiaPropertyCart.com
No comments:
Post a Comment